Select Page

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

न्यूट्रिचार्ज डीएचएसंबंधीचे प्रश्न

१. न्यूट्रिचार्ज डीएचए काय आहे?

न्यूट्रिचार्ज डीएचए हा एक पूरक आहार आहे.

२. न्यूट्रिचार्ज डीएचए कसे लाभदायक आहे?

न्यूट्रिचार्ज गर्भावस्थेत असलेल्या बाळाच्या मेंदूचा अनुकूलतम विकास होण्यास मदत करते (मेंदूतील अवयवांचा विकास).

३. बाळाच्या मेंदूचा पूर्ण विकास फक्त आईच्या उदरातच होतो का?

बाळाच्या मेंदूची ७०% वाढ आईच्या उदरात होते.

४. डीएचएच्या बाबतीत काही वैद्यकीय संशोधन झालेले आहे का?

अमेरिका, इंग्लंड, इटली, डेन्मार्क, इत्यादींसारख्या अनेक देशांनी गरोदर स्त्रियांनी डीएचएचे सेवन करण्यासंबंधीचे संशोधन केलेले आहे. ह्या संशोधनांनी असे सिद्ध झाले आहे की, गरोदर स्त्रियांनी डीएचएचे सेवन करणे अत्यंत सुरक्षित आहे आणि त्यामुळे गर्भातील मुलाच्या मेंदूची अनुकूलतम वाढ होण्यास मदत होते.

५. न्यूट्रिचार्ज डीएचएमध्ये डीएचएचे प्रमाण किती असते?

वैद्यकीय संशोधनानुसार गरोदर स्त्रियांना दररोज ४०० मिग्रॅ डीएचएची आवश्यकता असते. न्यूट्रिचार्ज डीएचएच्या प्रत्येक व्हेजिटरियन सॉफ्ट कॅप्सूलमध्ये ४०० एमजी डीएचए असते.

६. न्यूट्रिचार्ज डीएचए कोणी घेतले पाहिजे?

न्यूट्रिचार्ज डीएचए गरोदर स्त्रियांनी सेवन केले पाहिजे.

७. गर्भावस्थेतील बाळाला डीएचए कसे मिळेल?

जेव्हा आई न्यूट्रिचार्ज डीएचएचे सेवन करील, तेव्हा नाळेच्या माध्यमातून न्यूट्रिचार्ज बाळाला मिळेल.

८. गरोदर स्त्रियांव्यतिरिक्त अजून कोणकोण न्यूट्रिचार्ज डीएचएचे सेवन करू शकतात?

स्तन्यपान देणाऱ्या किंवा अंगावर दूध पाजणाऱ्या मातांनी न्यूट्रिचार्ज डीएचएचे सेवन केले पाहिजे.

९. गरोदरपणाच्या कितव्या महिन्यापासून न्यूट्रिचार्ज डीएचएचे सेवन सुरू केले पाहिजे?

गरोदरपणाच्या सुरुवातीपासून न्यूट्रिचार्ज डीएचएचे सेवन केले पाहिजे.

१०. गरोदर राहण्यापूर्वी न्यूट्रिचार्ज डीएचएचे सेवन केले जाऊ शकते का?

होय, एकही दिवसाचा तोटा होऊ नये म्हणून गरोदर राहण्याची विचार करीत असल्यापासून न्यूट्रिचार्ज डीएचएचे सेवन सुरू केले पाहिजे.

११. गरोदरपणाचे दोन ते तीन महिने उलटून गेलेले असतील आणि तरीही न्यूट्रिचार्ज डीएचएचे सेवन सुरू केलेले नसेल, तर काय केले पाहिजे?

तुम्ही आजपासूनच न्यूट्रिचार्ज डीएचएचे सेवन सुरू करू शकता. तुम्ही त्याचे सेवन सुरू करताच त्याचा बाळाला लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

१२. न्यूट्रिचार्ज डीएचए कुठपर्यंत सेवन करीत राहिले पाहिजे?

गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत आणि स्तन्यपान देत असलेल्या संपूर्ण कालावधीत न्यूट्रिचार्ज डीएचए सेवन केले पाहिजे.

१३. न्यूट्रिचार्ज डीएचए दिवसाच्या कोणत्या वेळेत सेवन केले पाहिजे?

न्यूट्रिचार्ज डीएचए दिवसाच्या कोणत्याही वेळेत सेवन केले जाऊ शकते.

१४. एका दिवसात न्यूट्रिचार्ज डीएचएच्या किती कॅप्सूल्स सेवन केल्या पाहिजेत?

दररोज फक्त एक न्यूट्रिचार्ज डीएचएची कॅप्सूल सेवन केली पाहिजे.

१५. न्यूट्रिचार्ज डीएचएच्या वासामुळे गरोदर स्त्रियांना मळमळ होऊ शकते का?

न्यूट्रिचार्ज डीएचएला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही. त्याला जळलेल्या साखरेसारखा गोड सुगंध येतो, जो सर्व गरोदर स्त्रियांना आवडेल.

१६. न्यूट्रिचार्ज डीएचए डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शची आवश्यकता असते का?

न्यूट्रिचार्ज डीएचए हे एक पूरक अन्न आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नसते.

१७. न्यूट्रिचार्ज वूमन टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाएट यांचे सेवन न्यूट्रिचार्ज डीएचएच्या सोबत केले जाऊ शकते का?

होय, न्यूट्रिचार्ज वूमन टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाएट यांचे सेवन न्यूट्रिचार्ज डीएचएच्या सोबत केले जाऊ शकते.

१८. न्यूट्रिचार्ज डीएचएमध्ये टाकलेल्या व्हेजिटरियन डीएचएचा स्रोत काय आहे?

न्यूट्रिचार्ज डीएचएमध्ये टाकलेले व्हेजिटरियन हे समुद्रातील वनस्पतींपासून प्राप्त केलेले असते.

१९. न्यूट्रिचार्ज डीएचएच्या कॅप्सूलला व्हेजिटरियन कसे म्हटले जाऊ शकते?

न्यूट्रिचार्ज डीएचएची व्हेज सॉफ्ट कॅप्सूल शाकाहारी असलेल्या कॅरॅजीननपासून बनविलेली आहे.

२०. न्यूट्रिचार्ज डीएचए गरोदर स्त्रियांसाठी सुरक्षित आहे का?

न्यूट्रिचार्ज डीएचए गरोदर स्त्रियांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. ही त्यांच्यासाठीच तयार करण्यात आलेली आहे.

२१. न्यूट्रिचार्ज डीएचएच्या एका पॅकमध्ये किती कॅप्सूल्स असतात?

न्यूट्रिचार्ज डीएचएच्या प्रत्येक पॅकमध्ये ३० कॅप्सूल्स (१५ कॅप्सूल्सच्या दोन स्ट्रीप्स) असतात, ज्या संपूर्ण महिनाभर पुरतील.

न्यूट्रिचार्ज मॅनविषयीचे प्रश्न

१. न्यूट्रिचार्ज मॅन म्हणजे काय?

न्यूट्रिचार्ज मॅन म्हणजे एक समग्र दैनंदिन पोषक पूरक आहार आहे, ज्यातून पुरुषांच्या दैनंदिन पोषणाच्या गरजा पूर्ण करून त्यांना तंदुरुस्त ठेवणारी ३५ प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, ॲमिनो ॲसिड्‌स आणि अँटिऑक्सिडंट्‌स असतात.

२. न्यूट्रिचार्ज मॅन टॅब्लेट्‌स शाकाहारी व्यक्ती घेऊ शकतात का?

होय, त्यात कोणतेही प्राणीजन्य घटक (मांसाहारी) नसतात.

३. न्यूट्रिचार्ज मॅन टॅब्लेट दररोज घेतल्याचे काय फायदे असतात?

आधुनिक जीवनशैली, फास्ट फूड, असंतुलित आहार आणि आवश्यक ते घटक नीटपणे शोषले न जाणे यामुळे सर्व सूक्ष्म पोषक घटक आवश्यक त्या प्रमाणात मिळणे अवघड होते. या सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेमुळे शक्ती आणि स्टॅमिना कमी होऊ शकतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, स्नायू, हाडे आणि दात, इत्यादी अशक्त होऊ शकतात. न्यूट्रिचार्ज मॅन आवश्यक असलेल्या प्रमाणात महत्त्वाचे पोषक घटक पुरविते, विविध अवयवप्रणालींची कार्ये नीट राखण्यास मदत होते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी आणि मधुमेहासाठी लाभदायक असते.

४. न्यूट्रिचार्ज मॅन टॅब्लेटचे काही दुष्परिणाम असतात का?

न्यूट्रिचार्ज मॅन जेवणानंतर घेतल्यास बहुतेक व्यक्तींच्या बाबतीत सामान्यत: नीटपणे सहन केले जाते. क्वचितप्रसंगी यामुळे मळमळ, उलट्या आणि पोटदुखी होऊ शकते.

५. मी मधुमेही आहे, मी न्यूट्रिचार्ज मॅनचे सेवन करू शकतो का?

होय, तुम्ही न्यूट्रिचार्ज मॅनचे सेवन करू शकता, कारण ते मधुमेही व्यक्तीसाठी हानीकारक नाही. क्रोमिअम, व्हॅनॅडिअम आणि जस्त यांसारखी खनिजे मधुमेहामध्ये साह्यकारी ठरू शकतात. ग्रीन टीचे सत्त्व चरबीचे ज्वलन करण्यास उपयुक्त ठरू शकते, तर जीवनसत्त्व अ आणि इतर ॲठटिऑक्सिडंट्‌स रोगप्रतिकारक शक्ती वाढवून डोळ्यांच्या हानीला आळा घालू शकते. परंतु जर तुम्ही आधीच जीवनसत्त्वांचा आणि खनिजांचा पूरक आहार घेत असलात, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

६. ह्या उत्पादनाचा वापर कोणी करावा?

न्यूट्रिचार्ज मॅन १४ वर्षांवरील मुलगे आणि सर्व प्रौढ पुरुष सेवन करू शकतात.

७. मी न्यूट्रिचार्ज मॅन केव्हा सेवन करू शकतो आणि दिवसातून किती टॅब्लेट्‌स?

न्याहारीनंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास पाण्याबरोबर न्यूट्रिचार्जची एक टॅब्लेट दररोज घ्या.

८. न्यूट्रिचार्ज घेण्यापूर्वी मला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता आहे का?

एक पूरक आहार असल्याने न्यूट्रिचार्ज मॅन तुम्ही स्वत:च घेऊ शकता, पण तुम्हाला आवश्यक वाटल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

९. मी हे घेणे काही काळ चालू ठेवल्यास माझे वजन वाढेल किंवा कमी होईल का?

न्यूट्रिचार्ज मॅन एक पोषक पूरक आहार असल्याने, जे आहारातील कमतरता भरून काढण्याचे कामच केवळ करते आणि त्यामुळे वजन वाढत नाही. ग्रीन टीच्या सत्त्वामुळे चरबीचे ज्वलन होऊ शकते.

१०. न्यूट्रिचार्ज मॅन औषध आहे का?

न्यूट्रिचार्ज मॅन टॅब्लेट औषध नाहीए. ते बी काँप्लेक्स जीवनसत्त्व, इतर जीवनसत्त्वे, खनिजे आणि ॲमिनो ॲसिड यांच्यासह असलेला एक दैनंदिन पूरक आहार आहे.

११. हे किती दिवस घेत राहिले पाहिजे?

न्यूट्रिचार्ज मॅनची एक टॅब्लेट दीर्घकाळापर्यंत घेत राहिले पाहिजे.

१२. मला काही दिवस न्यूट्रिचार्ज मॅन घ्यायचे व्यसन लागेल का?

न्यूट्रिचार्ज मॅन टॅब्लेट ही व्यसन लावणारी नाही आणि तुम्ही तुम्हाला वाटेल तेवढा वेळ ती चालू ठेवू शकता, पण जास्तीतजास्त लाभ प्राप्त करण्यासाठी ती दीर्घकाळपर्यंत घेण्याचा सल्ला दिला जातो.

१३. न्यूट्रिचार्ज मॅन घेण्यापूर्वी मी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे का?

एक दैनंदिन पूरक आहार म्हणून न्यूट्रिचार्ज मॅन टॅब्लेट खरेदी करण्यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नसते. जगभरात आरोग्यविषयक/आहारविषयक पूरक अन्नपदार्थ प्रिस्क्रिप्शनशिवाय विकले जातात. आरोग्यरक्षक उत्पादनांच्या संभाव्य मोठ्या फायद्यांबद्दल भारतातील लोकांमध्येही जाणीवन निर्माण होत आहे आणि न्यूट्रिचार्ज मॅन हा एक उच्च गुणवत्ता असलेला पूरक आहार आहे.

१४. न्यूट्रिचार्ज मॅन एखादा ट्रायल पॅक उपलब्ध आहे का?

न्यूट्रिचार्ज मॅनचा ३० टॅब्लेटचा पॅक फक्त ३५०/- रुपयांमध्ये मिळतो आणि तो एक संपूणॅ महिना टिकतो.

१५. मी आधीच एका विशिष्ट आहारयोजनेनुसार आहार घेत आहे. तरीही मी न्यूट्रिचार्ज घेऊ शकतो का?

तुम्ही जर विशेष आहार घेत असलात तर न्यूट्रिचार्ज मॅन लाभदायक ठरू शकते, कारण त्यातून बहुमूल्य जीवनसत्त्वे, खनिजे आणि ॲमिनो ॲसिड्‌स मिळतात, जी तुमच्या कठोर पथ्यातून कदाचित मिळणार नाहीत.

न्यूट्रिचार्ज वूमनसंबंधीचे प्रश्न

१. न्यूट्रिचार्ज वूमन टॅब्लेट घेतल्याचे फायदे कोणते?

न्यूट्रिचार्ज वूमन टॅब्लेट स्त्रियांना, फायटोन्यूट्रिअंट्‌ससहित १४ दुर्मीळ फळांपासून प्राप्त केलेले ५३ लाभदायक पोषक घटक पुरविते, ज्यामुळे स्त्रियांचे आरोग्य उत्तम राहून त्या तरुण राहतात. त्यातून ६ खास पोषकद्रव्येही मिळतात, ज्यामुळे स्त्रियांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक विशिष्ट समस्या दूर होतात. शिवाय, ३३ महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्‌स आणि ॲमिनो ॲसिड्‌स यांच्यामुळे त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते.

२. न्यूट्रिचार्ज वूमन शाकाहारी लोक घेऊ शकतील का?

होय, तिचे सेवन शाकाहारी व्यक्ती करू शकतात, कारण न्यूट्रिचार्ज वूमन टॅब्लेट वूमनमध्ये कोणतेही प्राणीजन्य (मांसाहारी) घटक नसतात.

३. न्यूट्रिचार्ज वूमनचे काही दुष्परिणाम असतात का?

न्यूट्रिचार्ज वूमन जर बहुतेक स्त्रियांनी त्यांचा दैनंदिन डोस म्हणून जेवणानंतर घेतली, तर ती नीटपणे सहन केली जाते. क्वचितप्रसंगी यामुळे मळमळ, उलट्या, बद्धकोष्ठता, अतिसार किंवा पोटात दुखणे अशा गोष्टी होऊ शकतात.

४. मी मधुमेही आहे. मी न्यूट्रिचार्ज वूमनचे सेवन करू शकते का?

न्यूट्रिचार्ज वूमन संभाव्यत: मधुमेहींसाठी लाभदायक असते. क्रोमिअम आणि व्हॅनॅडिअम यांच्यासारख्या खनिजांमुळे शरीर ज्या शर्करेचा वापर करते, त्यात सुधारणा होते; ग्रीन टी सत्त्वामुळे चरबीचे ज्वलन होण्यास मदत होऊ शकते, तर जीवनसत्त्व अ, जस्त आणि इतर अँटिऑक्सिडंट न्यूट्रिअंट्‌स यांच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि डोळ्यांना पोहोचणारी हानी रोखू शकते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता.

५. न्यूट्रिचार्ज वूमन टॅब्लेटचे सेवन कोण करू शकतात?

न्यूट्रिचार्ज वूमनचे सेवन १४ वर्षांवरील सर्व मुली आणि स्त्रिया दररोज करू शकतात.

६. न्यूट्रिचार्ज वूमन टॅब्लेट खरेदी करण्यासाठी मला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता आहे का?

न्यूट्रिचार्ज वूमन आरोग्यासाठी पूरक आहार असल्यामुळे ती डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेतली जाऊ शकते, पण तुम्हाला तशी आवश्यकता वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

७. मी दीर्घकाळपर्यंत न्यूट्रिचार्ज वूमन टॅब्लेट घेत राहिले, तर माझे वजन वाढेल किंवा कमी होईल का?

आरोग्यासाठी एक पूरक आहार म्हणून न्यूट्रिचार्ज वूमन टॅब्लेटमुळे आहारातील कमतरता कमी होऊन त्यांना तंदुरुस्त राहण्यास आणि त्यांचा चयापचय सुधारण्यास मदत होऊ शकते. शरीराच्या वजनावर परिणाम करणारे खास घटक तिच्यात नसतात. ग्रीन टीच्या सत्त्वामुळे चरबीचे ज्वलन होऊ शकते.

८. न्यूट्रिचार्ज वूमन हे औषध आहे का?

न्यूट्रिचार्ज वूमन हे औषध नाही. हा आरोग्यासाठी एक पूरक आहार आहे, ज्यात संभाव्यत: लाभदायक वनस्पतीजन्य (फायटोन्यूट्रिअंट्‌स), स्त्रियांसाठी योग्य दुर्मीळ पोषक घटक, खनिजे, ॲमिनो ॲसिड्‌स, बी-कॉंप्लेक्स आणि इतर जीवनसत्त्वे असतात.

९. न्यूट्रिचार्ज वूमन टॅब्लेट किती काळपर्यंत घेणे चालू ठेवले पाहिजे?

एक न्यूट्रिचार्ज वूमन टॅब्लेट न्याहारीनंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर ग्लासभर पाण्यासोबत घेतली पाहिजे.

न्यूट्रिचार्ज प्रोडाएटसंबंधीचे प्रश्न

प्र.१ – एखाद्याने न्यूट्रिचार्ज प्रोडाएटचे सेवन किती काळ करीत राहिले पाहिजे?

प्रौढ व्यक्ती आणि मुले अशा दोहोंना शरीराच्या ऊतींच्या वाढीसाठी, दुरुस्तीसाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी अंदाजे १ग्रॅ/किग्रॅ प्रोटिनची आवश्यकता असते. न्यूट्रिचार्ज प्रोडाएट हे प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत असल्याने प्रथिनांची तूट भरून काढण्यासाठी शिफारस केलेल्या मात्रेमध्ये दररोज सेवन केले जाऊ शकते. अमेरिकन अन्न आणि प्रशासन विभागानेही (यूएसएफडीए) ह्याची पुष्टी केलेली आहे की, दररोज २५ ग्रॅम कमी चरबीयुक्त सोया प्रोटिन घेतल्याने हृदयाच्या विकारांपासून संरक्षण मिळते.

प्र.२ – जर मी पुरेशा प्रमाणात फळे, भाज्या आणि तृणधान्ये घेतली, तरीही न्यूट्रिचार्ज प्रोडाएट लाभदायक ठरते का?

फळे, भाज्या आणि तृणधान्ये काही प्रमाणात प्रथिने देतातच, पण आपण जोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, कठीण कवचाची फळे, तृणधान्ये आणि दुग्धोत्पादने पुरेशा प्रमाणात खात नाही, तोपर्यंत आपल्याला पुरेशश प्रमाणात आवश्यक ती ॲमिनो ॲसिड्‌स असलेली पचनयोग्य प्रथिने कदाचित सहजपणे मिळणार नाहीत. आपल्यातील काही जणांना भाजीपाल्यातील प्रथिने पचवायला त्रास होऊ शकतो. न्यूट्रिचार्ज प्रोडाएट उच्च दर्जाचे सोया प्रोटिन पुरवते, जे सहजपणे पचणाऱ्या, हृदयासाठी गुणकारी असलेल्या, संपूर्ण प्रथिनांचा स्रोत असते आणि ते आपल्या एकूणच आरोग्यासाठी उत्तम असते. आपल्याला न्यूट्रिचार्ज प्रोडाएटमधून सर्व नऊ प्रकारची आवश्यक ॲमिनो ॲसिड्‌स समतोल प्रमाणात मिळतात.

प्र.३ – मला लवकर दमायला आणि थकायला होतं. मला न्यूट्रिचार्ज प्रोडाएटची काही मदत होईल का?

प्रथिनांच्या कमतरतेमुळे विविध अवयव अशक्त होतात, ऊतींची दुरुस्ती होण्यास आणि देखभाल करण्यास आळा घातला जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. न्यूट्रिचार्ज प्रोडाएट उच्च दर्जाचे शुद्ध केलेली आणि प्रक्रिया केलेली सोया प्रथिने पुरवते, ज्यामुळे शारीरिक शक्ती वाढण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे प्राप्त करण्यासाठी प्रौढ व्यक्तींनीही न्यूट्रिचार्ज मॅन/वूमन दररोज घेतली पाहिजे.

प्र. ४ – न्यूट्रिचार्ज प्रोडाएट कोणते दुष्परिणाम आहेत का?

एकूण पोषक आहाराचा भाग म्हणून आपण फक्त समतोल प्रमाणातच प्रथिने घेतली पाहिजेत. न्यूट्रिचार्ज प्रोडाएट हे शिफारस केलेल्या मात्रेत एक चांगल्या प्रकारे सहन केले जाते पण जास्त प्रमाणात घेतल्यास पोटफुगी (वायू) होऊ शकते. मूत्रपिंडाचा विकार असलेल्या रुग्णांनी न्यूट्रिचार्ज प्रोडाएट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. गाऊट (पायांच्या बोटांची सांधेदुखी) असलेले रुग्ण न्यूट्रिचार्ज प्रोडाएट घेऊ शकत नाहीत.

प्र. ५ – मी दुसरी औषधेही घेत आहे, मी त्यांच्यासोबत न्यूट्रिचार्ज प्रोडाएटचा वापर करू शकतो का?

न्यूट्रिचार्ज प्रोडाएट आरोग्यासाठी पूरक आहार असल्याने सर्वसाधारण रोग असलेले लोकही ते घेऊ शकतात. परंतु, यकृताचे आणि मूत्रपिंडाचे विकार असलेले रुग्ण आणि गुंतागुंतीची इतर विकार असलेले रुग्ण यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. गाऊट असलेले रुग्ण न्यूट्रिचार्ज प्रोडाएट घेऊ शकत नाहीत.

प्र. ६ – मी हृदयरोग असलेला मधुमेही आहे, मी न्यूट्रिचार्ज प्रोडायएटचे सेवन करू शकतो/ते का?

न्यूट्रिचार्ज प्रोडाएटमध्ये सोया प्रोटिन्स असतात, ज्यांची मदत रक्तशर्करेची आणि कोलेस्टेरॉलचीही पातळी नीट राखण्यासाठी होऊ शकते. शिवाय, न्यूट्रिचार्ज प्रोडाएटमध्ये साखर आणि चरबी मिसळलेली नसते. त्यात माल्टोडेक्स्ट्रिमही (तंतूमय पदार्थ) असते, जे मधुमेहासाठी लाभदायक असते. परंतु गुंतागुंतीचे आजार असलेल्या रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

प्र.७ – आपण ते मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना देऊ शकतो का?

मुले आणि वृद्ध व्यक्ती न्यूट्रिचार्ज प्रोडाएट घेऊ शकतात. वाढत्या वयातील मुलांना त्यांच्या वाढीसाठी आणि शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेली सर्व ॲमिनो ॲसिड्‌स यातून मिळू शकतात. वयोवृद्ध व्यक्ती न्यूट्रिचार्ज प्रोडाएटपासून मिळणारे परिपूर्ण प्रोटिन सहजपणे पचवू शकतात आणि त्यांचे आरोग्य अधिक चांगले राहू शकते. न्यूट्रिचार्ज प्रोडाएटमधील तंतूमय पदार्थांमुळे पचन सुधारू शकते.

प्र.८ – गरोदर आणि स्तन्यपान देणाऱ्या स्त्रियांना न्यूट्रिचार्ज प्रोडाएट दिल्याचे काय फायदे असतात?

गरोदर आणि स्तन्यपान देणाऱ्या स्त्रियांची प्रथिनांची गरज मोठ्या प्रमाणावर वाढते. त्या त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच न्यूट्रिचार्ज प्रोडाएट घेऊ शकतात, कारण उच्च दर्जाची प्रथिने व लोह, फोलिक ॲसिड आणि कॅल्शिअम असलेले एक उत्कृष्ट पूरक आहार म्हणून काम करते. परिपूर्ण प्रथिनांमुळे आई आणि मूल अशा दोघांमध्ये रोगांना आळा घालण्याची शक्ती वाढते आणि मुलाच्या योग्य वाढीस मदत करते.

प्र.९ – शाकाहारी लोक न्यूट्रिचार्ज प्रोडाएट घेऊ शकतात का?

होय, शाकाहारी लोक हे घेऊ शकतात, कारण न्यूट्रिचार्ज प्रोडाएटमध्ये कोणताही प्राणीजन्य (मांसाहारी) घटक नसतो.

प्र.१० – मी न्यूट्रिचार्ज प्रोडाएट कसे आणि किती प्रमाणात घ्यावे?

प्रौढ पुरुष आणि स्त्रिया दररोज न्यूट्रिचार्ज प्रोडाएटची दोन मापे (प्रत्येकी २० ग्रॅम) घेऊ शकतात, तर मुले १ माप घेऊ शकतात. थंड दुधात किंवा पाण्यात न्यूट्रिचार्ज प्रोडाएट पावडर शेकर किंवा मिक्सरमध्ये टाका. शिवाय चवीसाठी साखर किंवा स्वीटनर टाका आणि हलवा. त्यानंतर हे मिश्रण पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात दूध आणि पाणी टाका.

न्यूट्रिचार्ज एस अँड एफसंबंधीचे प्रश्न

प्र.१ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफ काय आहे?

न्यूट्रिचार्ज एस अँड एफ हा एक पोषक पूरक आहार आहे, जो शरीरातील चरबी कमी करण्यासाठी परिणामकारक आहे.

प्र.२ – माझे शरीर तंदुरुस्त असताना मी न्यूट्रिचार्ज एस अँड एफ का सेवन करावे?

सामान्य शरीरातही शारीरिक चरबी असते, जी फक्त बॉडी स्कॅनरमुळेच समजून येऊ शकते. कृपया बॉडी स्कॅनरवर तुमची तपासणी करून घ्या. जर पुरुषांचे शरीर २५%पेक्षा अधिक आणि स्त्रियांचे शरीर ३०%पेक्षा अधिक स्थूल असेल, तर तुम्ही न्यूट्रिचार्ज एस अँड एफ सेवन करणे सुरू केले पाहिजे.

प्र.३ – वजन कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान स्नायू सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे का असते?

कारण स्नायू कमी झाल्यास अशक्तपणा येतो.

प्र.४ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफ फार खर्चिक असते का?

कृपया पैशातून जे मूल्य प्राप्त होते ते समजून घ्या. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे भविष्यात हृदयाच्या समस्या, मधुमेह, गुडघेदुखी, इत्यादींसारखे गंभीर आजार होऊ शकतात. ह्या आजारांवर लाखो रुपये खर्च करावा लागतो. तुम्ही जर न्यूट्रिचार्ज एस अँड एफच्या मदतीने तुमच्या शरीरातील चरबी कमी केली, तर तुम्ही ह्या जीवघेण्या आजारांपासून तुमचा बचाव तर करू शकालच, पण त्यासाठी कराव्या लागणारा आवाढव्य खर्चही वाचवू शकाल.

प्र.५ – न्यूट्रिचार्ज प्रोडाएटचे सेवन न्यूट्रिचार्ज एस अँड एफच्या सोबतीने केले जाऊ शकते का?

न्यूट्रिचार्ज एस अँड एफ रात्रीच्या जेवणाऐवजी घेतले पाहिजे. प्रत्येक सकाळी एकतर न्यूट्रिचार्ज मॅन आणि न्यूट्रिचार्ज प्रोडाएट किंवा न्यूट्रिचार्ज वूमन आणि न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाएट सेवन करणे अत्यंत लाभदायक असते.

प्र.६ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफ दिवसाच्या कोणत्या वेळेत सेवन केले पाहिजे?

न्यूट्रिचार्ज एस अँड एफ हे ‘‘जेवणाऐवजी’’ घ्यायचे उत्पादन आहे. ते रात्रीच्या जेवणाऐवजी घ्यायचे आहे.

प्र.७ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफ किती काळपर्यंत सेवन केले पाहिजे?

बॉडी स्कॅनरवर पुरुषांच्या शरीरातील चरबी २०% पेक्षा कमी स्त्रियांच्या शरीरातील चरबी २५% पेक्षा कमी दिसेपर्यंत न्यूट्रिचार्ज एस अँड एफ सेवन केले पाहिजे.

प्र.८ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफ आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यास कशी मदत करते?

न्यूट्रिचार्ज एस अँड एफमध्ये असलेले चरबी कमी करणारे घटक आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.

प्र.९ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफ इतर बाजारात उपलब्ध असलेल्या वजन कमी करणाऱ्या उत्पादनांपेक्षा चांगले कसे आहे?

न्यूट्रिचार्ज एस अँड एफमध्ये चरबी कमी करणारे घटक आणि उत्तम दर्जाची प्रथिने असतात.

प्र.१० – न्यूट्रिचार्ज एस अँड एफमध्ये प्रथिने का मिसळलेली आहेत?

न्यूट्रिचार्ज एस अँड एफमध्ये असलेली प्रथिने स्नायूंचे संरक्षण करून शरीरात नव्याने चरबी जमा होण्यास आळा घालतात.

प्र.११ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफमध्ये किती आणि कोणते चरबी कमी करणारे घटक मिसळलेले असतात?

न्यूट्रिचार्ज एस अँड एफमध्ये चरबी कमी करणारे तीन घटक असतात, ते आहेत: गार्सिनिया कंबोजिया, सीएलए आणि ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट

प्र.१२ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफमध्ये टाकलेल्या ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्टचे काय खास वैशिष्ट्य आहे?

न्यूट्रिचार्ज एस अँड एफमध्ये टाकलेल्या ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्टमध्ये स्वेटॉल असते आणि ते वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध करण्यात आलेले आहे.

प्र.१३ – ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट शरीरातील चरबी कमी करण्यास कशी मदत करते?

ते शरीरात आधीच जमा झालेली चरबी कमी करते.

प्र.१४ – मी जर रात्री ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट घेतले, तर मला झोप लागणा नाही.

न्यूट्रिचार्ज एस अँड एफमध्ये टाकलेले ग्रीन कॉफी एक्स्ट्रॅक्ट हे डिकॅफिनेटेड केलेले असते. यामुळे रात्रीची झोप कमी होणार नाही.

प्र.१५ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफमध्ये कोणते सीएलए टाकलेले असते?

टोनॅलिम सीएलए (इटलीमधले) न्यूट्रिचार्ज एस अँड एफमध्ये टाकलेले असते.

प्र.१६ – हे सीएलए वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले असते का?

होय, हे सीएलए शरीरातील चरबी कमी करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले असते.

प्र.१७ – सीएलएची मदत शरीरातील चरबी कमी करण्यासाठी कशी होते?

सीएलए शरीरातील चरबीच्या पेशींची संख्या कमी करते. यामुळे ह्या पेशींमध्ये जमा झालेली चरबीही कमी होते.

प्र.१८ – गार्सिनिया कंबोजियामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास कशी मदत होते?

गार्सिनिया कंबोजिया शरीरात जमा झालेली जुनी चरबी कमी करते आणि शरीरात नवी चरबी जमा होणे थांबवते.

प्र.१९ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफ वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाल्याचे महत्त्व काय आहे?

ह्याचा अर्थ असा आहे की, सरकारमान्य नीतिमत्ता समितीने असे प्रमाणित केलेले आहे की, हे उत्पादन चरबी कमी करण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. यातून हेही सिद्ध होते की, हे उत्पादन वापरण्यासाठी पूर्णत: सुरक्षित आहे.

प्र.२० – न्यूट्रिचार्ज एस अँड एफमध्ये किती प्रकारची प्रथिने असतात?

न्यूट्रिचार्ज एस अँड एफमध्ये आयसोलेटेड सोयो प्रोटिन आणि व्हे प्रोटिन असतात.

प्र.२१ – प्रत्येक सॅशेमध्ये किती प्रथिने असतात?

प्रत्येक सॅशेमध्ये १५ ग्रॅम प्रथिने असतात.

प्र.२२ – ही प्रथिने कशातून घेतलेली असतात?

ही प्रथिने ड्युपाँट, अमेरिका येथून घेतलेली असतात.

प्र.२३ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफ घेत असताना आहाराची काळजी घेतली पाहिजे का?

न्यूट्रिचार्ज एस अँड एफ घेत असताना आपण रात्रीचे जेवण घेऊ नये. १५०० उष्मांक असलेले अन्न संपूर्ण दिवसात सेवन केले पाहिजे आणि आपण चरबीयुक्त अन्नपदार्थ सेवन करू नयेत. न्यूट्रिशन सायन्स पुस्तकात दिलेला आहार तुम्ही घेऊ शकता.

प्र.२४ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफ घेत असताना व्यायाम करणे आवश्यक असते का?

होय, न्यूट्रिचार्ज एस अँड एफ घेत असताना व्यायाम करणे (६००० पावले चालणे आणि २५० पायऱ्या चढणे) केला पाहिजे.

प्र.२५ – एखादी व्यक्ती मधुमेही असली, तर न्यूट्रिचार्ज एस अँड एफ घेतले पाहिजे का?

जर एखादी व्यक्ती मधुमेही असली, तर पहिल्यांदा कृपया न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट, न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे यांच्या मदतीने तिचा मधुमेह नियंत्रणात आणा. त्यानंत शरीरातील चरबी कमी करण्यासाठी कृपया न्यूट्रिचार्ज एस अँड एफ घेण्याचा सल्ला द्या.

प्र.२६ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफ सेवन वयाच्या कितव्या वर्षापासून सुरू केले जाऊ शकते?

न्यूट्रिचार्ज एस अँड एफचे सेवन वयाच्या १४व्या वर्षापासून सुरू करावे.

प्र.२७ – न्यूट्रिचार्ज एस अँड एफ घेतल्यानंतर एखाद्याला रात्री भूक लागली तर काय करावे?

जर न्यूट्रिचार्ज एस अँड एफ घेतल्यानंतर एखाद्याला रात्री भूक लागली, तर सॅलाड किंवा सूप घेतले जाऊ शकते.

न्यूट्रिचार्ज बीजेसंबंधीचे प्रश्न

प्र.१ – न्यूट्रिचार्ज बीजे काय आहे?

न्यूट्रिचार्ज बीजे हा हाडांसाठी आणि सांध्यांसाठी असलेला पूरक आहार आहे. तो विशेषत: गुडघ्यांच्या सांध्यासाठी तयार करण्यात आलेला आहे.

प्र.२ – न्यूट्रिचार्ज बीजे औषध आहे का?

न्यूट्रिचार्ज बीजे औषध नाहीए. ते म्हणजे एक पूरक आहार आहे.

प्र.३ – न्यूट्रिचार्ज बीजेचे सेवन कोणी केले पाहिजे?

ज्यांना गुडघ्याच्या सांध्यांमध्ये वेदना होत असतात, त्यांनी ताबडतोब न्यूट्रिचार्ज बीजेचे सेवन सुरू केले पाहिजे.

प्र.४ – न्यूट्रिचार्ज बीजेचा उपयोग दुसऱ्या सांध्यांमधील वेदनांसाठी आणि त्यांच्या मजबुतीसाठी केला जाऊ शकतो का?

गुडघ्याचे सांधे हे अत्यंत महत्त्वाचे सांधे असतात, कारण ते आपल्या संपूर्ण शरीराचे वजन पेलत असतात. म्हणून ह्या सांध्यांची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. असे असले तरीही न्यूट्रिचार्ज बीजे इतर सांध्यांचे आरोग्य सुधारू शकते.

प्र.५ – न्यूट्रिचार्ज बीजे फार महाग आहे का?

कृपया पैशातून जे मूल्य प्राप्त होते ते समजून घ्या. गुडघे सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी लोखो रुपये खर्च करावा लागतो. तुम्ही जर आताच न्यूट्रिचार्ज बीजे घ्यायला सुरुवात केली, तर तुम्ही भविष्यात होणाऱ्या अशा मोठ्या खर्चापासून स्वत:ला वाचवू शकता.

प्र.६ – न्यूट्रिचार्ज बीजे टॅब्लेट आणि सॅशे एकत्र घेणे गरजेचे आहे का?

न्यूट्रिचार्ज बीजेचे शास्त्रीय मिश्रण अशा प्रकारे तयार करण्यात आलेले आहे की, काही पोषक घटक टॅब्लेटमध्ये टाकण्यात आलेले आहेत आणि काही सॅशेमध्ये टाकलेले आहेत. टॅब्लेटमध्ये जे पोषकघटक परिणामकारक गुणवत्तेसह टाकले जाऊ शकत नाहीत, ते सॅशेमध्ये टाकण्यात आलेले आहेत. टॅब्लेटमध्ये असे पोषक घटक टाकलेले आहेत, जे चवीला कडू असल्याने सॅशेमध्ये टाकता आले नसते. म्हणून जास्तीतजास्त परिणामकाराकतेसाठी न्यूट्रिचार्ज बीजे टॅब्लेट आणि सॅशे एकत्रितपणे घेतले पाहिजेत.
काही पोषक घटक टॅब्लेटमध्ये टाकण्यात आलेले आहेत. ते अधिक चांगल्या प्रकारे शोषले जावेत म्हणून इतर पोषक घटक सॅशेमध्ये टाकण्यात आलेले आहेत. उदहारणार्थ, व्हिटॅमिन के२७ चांगल्या प्रकारे शोषले जावे म्हणून कॅल्शिअम सॅशेमध्ये टाकण्यात आलेले आहे. अशा प्रकारे, सॅशे आणि टॅब्लेट एकत्रितपणे सेवन करणे आवश्यक असते.

प्र.७ – न्यूट्रिचार्ज बीजे किती काळापर्यंत सेवन केले पाहिजे?

सर्वसाधारणपणे, न्यूट्रिचार्ज बीजे त्याचा परिणाम एका महिन्यानंतर दाखवायला सुरुवात करते. पण अजून चांगला परिणाम साधण्यासाठी ते किमान ३ महिने सेवन केले पाहिजे. आराम मिळण्यासाठीचा कालावधी त्याच्या/तिच्या गुडघ्याच्या सांध्यांच्या स्थितीनुसार व्यक्तिगणिक बदलतो. न्यूट्रिचार्ज बीजे दीर्घकाळपर्यंत सेवन करीत राहिल्याने काही इजा होत नाही.

प्र.८ – न्यूट्रिचार्ज बीजे दिवसाच्या कोणत्या वेळेत सेवन केले पाहिजे?

न्यूट्रिचार्ज बीजे संध्याकाळी घेतले पाहिजे. जर ते संध्याकाळी घेणे सोयीस्कर नसेल, तर सेवन करणारी व्यक्ती तिच्या सोयीनुसार वेळ ठरवू शकते. पण कृपया काळजी घ्या की, ते दररोज त्याच वेळी घेतले जाईल.

प्र.९ – न्यूट्रिचार्ज बीजेचे सेवन कसे केले गेले पाहिजे?

सॅशेतील पावडर ग्लासभर पाण्यात विरघळवली पाहिजे. टॅब्लेट त्याच्यासोबत घेतली पाहिजे.

प्र.१० – न्यूट्रिचार्ज बीजेचे कोणते दुष्परिणाम होण्याची शक्यता असते का?

न्यूट्रिचार्ज बीजेमुळे काही दिवस शौचास लागू शकते.

प्र.११ – न्यूट्रिचार्ज बीजेपासून लाभ मिळालेले लोक आपल्याला कुठे आढळतील?

असे लोक तुम्हाला जिथे कुठे जिना असेल, तिथे सापडतील. ज्या लोकांना जिने चढताना वेदना आणि त्रास होता, त्यांच्यासाठी न्यूट्रिचार्ज बीजे लाभदायक आहे.

प्र.१२ – ग्लुकोसॅमाईन सल्फेटपेक्षा ग्लुकोसॅमाईन हायड्रोक्लोराईड कसे उत्तम असते?

ग्लुकोसॅमाईन सल्फेटच्या ७४% शुद्धतेच्या तुलनेत ग्लुकोसॅमाईन हायड्रोक्लोराईड ९९% शुद्ध असते. ७५० मिग्रॅ ग्लुकोसॅमाईन हायड्रोक्लोराईड १३०४ ग्लुकोसॅमाईन सल्फेटच्या बरोबरीचे असते. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक उत्पादनांमध्ये माशाच्या हाडापासून प्राप्त केलेले ग्लुकोसॅमाईन असते. न्यूट्रिचार्ज बीजेमध्ये टाकलेले ग्लुकोसॅमाईन हायड्रोक्लोरिक पूर्णत: शाकाहारी असते.

प्र.१३ – न्यूट्रिचार्ज बीजेमध्ये टाकलेले मिल्क कॅल्शिअम इतर कोणत्याही कॅल्शिअमपेक्षा चांगले कसे काय असते?

इतर कोणत्याही कॅल्शिअमपेक्षा मिल्क कॅल्शिअम चांगल्या प्रकारे शोषले जाते. मिल्क कॅल्शिअममध्ये हाडे मजबूत करणारी खनिजे असतात. अशी खनिजे इतर कोणत्याही कॅल्शिअममध्ये नसतात.

प्र.१४ – न्यूट्रिचार्ज बीजेमध्ये मॅग्नेशिअम का टाकलेले असते?

आपल्या अन्नातील कॅल्शिअमचे शोषण होण्यासाठी पुरेशा प्रमाणातील मॅग्नेशिअमची आवश्यकता असते. हाडांमध्ये कॅल्शिअम जमा करण्याच्या माध्यमातून हाडांच्या मजबुतीसाठीही मॅग्नेशिअम आवश्यक असते. मॅग्नेशिअमला त्याच्या असंख्य फायद्यामुळे ‘‘जादुई खनिज’’ संबोधले जाते.

प्र.१५ – मॅग्नेशिअमचे आरडीए काय असते? न्यूट्रिचार्ज बीजेमध्ये किती मॅग्नेशिअम असते?

प्र.१५ – मॅग्नेशिअमचे आरडीए काय असते? न्यूट्रिचार्ज बीजेमध्ये किती मॅग्नेशिअम असते?

प्र.१६ – इनुलिन म्हणजे काय आणि ते न्यूट्रिचार्ज बीजेमध्ये का वापरण्यात आलेले आहे?

इनुलिन हा एक नैसर्गिकरीत्या विद्राव्य तंतुमय पदार्थ आहे, जो कॅल्शिअमचे शोषण वाढवून हाडांची निगा राखते. इनुलिन हाडांमध्ये खनिजे साठवायलाही मदत करते.

प्र.१७ – न्यूट्रिचार्ज बीजेमध्ये रोझशिप एक्स्ट्रॅक्ट का टाकलेले असते?

रोझशिप एक्स्ट्रॅक्टमुळे गुडघ्यांच्या सांध्यांची लवचीकता आणि हालचाल वाढते.

प्र.१८ – जीवनसत्त्व के२७ गुडघ्यांच्या सांध्यांसाठी लाभदायक कसे ठरते?

जीवनसत्त्व के२७ कॅल्शिअम साठवून हाडे मजबूत करते.

प्र.१९ – न्यूट्रिचार्ज बीजेमध्ये किती प्रमाणात जीवनसत्त्व के२७ असते?

न्यूट्रिचार्ज बीजेच्या प्रत्येक टॅब्लेटमध्ये ५५ मायक्रो ग्रॅम जीवनसत्त्व के२७ असते.

प्र.२० – न्यूट्रिचार्ज बीजेमध्ये जीवनसत्त्व ‘ड’ का टाकलेले असते?

जीवनसत्त्व ‘ड’ हाडे मजबूत करणाऱ्या कॅल्शिअमचे आतड्यातील शोषण वाढवतात. यामुळे कुर्च्यांचे होणारे नुकसानही थांबू शकते.

प्र.२१ – न्यूट्रिचार्ज बीजेची चव कशी असते?

न्यूट्रिचार्ज बीजेमध्ये वेलची टाकलेली असते ज्यामुळे त्याला वेलचीचा छान सुगंध येतो.

प्र.२२ – गुडघ्याच्या सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक घेणे योग्य आहे का?

वेदनाशामकांमुळे तात्पुरता आराम मिळतो. कायमस्वरूपी आरामासाठी तुम्हाला तुमचे सांधे मजबूत केले पाहिजेत, तुमची हाडे मजबूत केली पाहिजेत आणि सांध्यांमधील द्रवपदार्थांचे प्रमाण वाढते.

प्र.२३ – न्यूट्रिचार्ज बीजे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाल्याचे काय महत्त्व आहे?

ह्याचा अर्थ असा आहे की, सरकारमान्य तज्ज्ञांच्या नीतिमत्ता समितीने असे प्रमाणित केलेले आहे की, हे उत्पादन गुडघ्यांच्या सांध्यांचे आरोग्य पुन्हा मिळवून देण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. यातून हेही सिद्ध होते की, हे उत्पादन वापरण्यासाठी पूर्णत: सुरक्षित आहे.

प्र.२४ – ग्राहकाकडे जर न्यूट्रिचार्ज बीजे खरेदी करण्यासाठी पैसे नसतील तर काय?

ग्राहकाकडे जर न्यूट्रिचार्ज बीजे खरेदी करण्यासाठी पैसे नसतील, तर जबरदस्तीने विक्री करू नका. ग्राहकाने जर न्यूट्रिचार्ज बीजेचा कोर्स पूर्ण केला नाही, तर त्याला त्याच्या सांधेदुखीपासून आराम मिळणार नाही. एक नकरात्मक ग्राहक दुसऱ्या ग्राहकांना नकारात्मक बनवून ठेवील.

प्र.२५ – न्यूट्रिचार्ज बीजे आराम मिळण्याच्या हमीसहित दिले जाऊ शकते का?

हो, नक्कीच. कृपया तुमच्या कुटुंबासाठी न्यूट्रिचार्ज बीजे वापरा. इतर समाधानी ग्राहकांचे अनुभव लिहून घ्या. अशा प्रकारे, तुम्ही स्वत:च न्यूट्रिचार्ज बीजेसाठी हमी बनाल.

न्यूट्रिचार्ज कीड्‌ससंबंधी प्रश्न

प्र.१ – आपण न्यूट्रिचार्ज कीड्‌स कोणत्या वयोगटासाठी देऊ शकतो?

न्यूट्रिचार्ज कीड्‌स २ ते १२ वयोगटासाठी आहे.

प्र.२ – न्यूट्रिचार्ज कीड्‌सचे मुख्य फायदे काय असतात?

न्यूट्रिचार्ज कीड्‌स ह्या नावातूनच हे समजते की, त्याच्यामुळे मेंदूच्या एकूणच विकासासाठी मदत होते, रोगप्रतिकारक शकती वाढते आणि शक्ती प्राप्त होते.

प्र.३ – न्यूट्रिचार्ज कीड्‌स आपण केव्हा दिले पाहिजे?

सकाळच्या न्याहारीनंतर सकाळी न्यूट्रिचार्ज कीड्‌स दिले गेले पाहिजे.

न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटसंबंधीचे प्रश्न

प्र.१ – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट हे काय आहे?

न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट पोषक पूरक आहार आहे, ज्याचा उद्देश मधुमेहपूर्व स्थितीतील व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करणे हा आहे. हा जगातील अशा प्रकारचे एकमेव पूरक आहार आहे.

प्र.२ – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट औषध आहे का?

न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट औषध नाहीए. ते म्हणजे एक पूरक आहार आहे.

प्र.३ – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट कोणी घेतले पाहिजेत?

मधुमेहपूर्व स्थितीतील व्यक्तींनी न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट घेतले पाहिजे.

प्र.४ – एखादी व्यक्ती मेधुमेहपूर्व स्थितीतील आहे किंवा काय हे कसे कळेल?

ग्लुकोमीटरने रक्तशर्करेची पातळी तपासल्यानंतर ती व्यक्ती मधुमेहपूर्व स्थितीतील आहे किंवा काय हे आपल्याला कळते. जर एखाद्या व्यक्तीची रक्तशर्करेची पातळी १४० एमजी/डीएल आणि २०० एमजी/डीएल असेल, तर ती व्यक्ती मधुमेहपूर्व स्थितीतील असते.

प्र.५ – एखाद्या व्यक्तीच्या रक्तशर्करेची पातळी १४० एमजी/डीएलपेक्षा कमी असेल तर काय केले पाहिजे?

पहिले म्हणजे अशी व्यक्ती निरोगी असल्याबद्दल तिचे अभिनंदन करा. त्यानंतर, तिला दररोज पीव्हीएमएफ ब्रेकफास्ट दररोज घ्यायला सांगा.

प्र.६ – मधुमेहपूर्व स्थितीची काही लक्षणे असतात का?

सामान्यत: मधुमेहपूर्व स्थितीची कोणतीही लक्षणे नसतात.

प्र.७ – मधुमेहपूर्व स्थितीमुळे काही इजा होऊ शकते का?

योग्य काळजी न घेतल्यास मधुमेहपूर्व स्थिती मधुमेहामध्ये रूपांतरित होऊ शकते. यामुळे डोळे, मूत्रपिंडे, हृदय आणि मेंदू यांना हानी पोहोचू शकते.

प्र.८ – मधुमेहपूर्व स्थितीतील लोकांनी किती वारंवार त्यांची रक्तशर्करा तपासून घेतली पाहिजे?

मधुमेहपूर्व स्थितीतील व्यक्तीने तिची रक्तशर्करा दर महिन्याला एकदा तपासली पाहिजे.

प्र.९ – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटमध्ये प्रथिने का टाकलेली असतात?

कारण प्रथिनांमुळे रक्तशर्करेच्या पातळीत वेगाने होणारी वाढ रोखली जाते आणि स्नायूंच्या ऱ्हासापासून बचाव होतो.

ज्यायोगे आपल्याला प्रथिनांमधून योग्य प्रमाणात प्रथिने मिळतात आणि अशक्त असल्यासारखे वाटत नाही.

प्र.१० – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेटमध्ये आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटमध्ये वनौषधी का टाकलेल्या असतात?

कारण त्यामुळे आतड्यांमध्ये रक्तशर्करा शोषून घेण्यास आळा घातला जातो. त्यांच्यामुळे वाढत्या रक्तशर्करेच्या दुष्परिणामांपासूनही बचाव होतो.

प्र.११ – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेटमध्ये आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटमध्ये टाकलेल्या वनौषधींचे गुणधर्म काय असतात?

सर्व वनौषधी सर्वोत्तम गुणवत्तेच्या असतात.

प्र.१२ – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटमध्ये दालचिनी का टाकलेली असते?

दालचिनी रक्तशर्करेची आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

प्र.१३ – दालचिनीमुळे कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते का?

होय, दालचिनीमुळे कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

प्र.१४ – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट फार महागडे आहेत का?

कृपया पैशातून जे मूल्य प्राप्त होते ते समजून घ्या. मधुमेहपूर्व स्थितीतील व्यक्तीने जर तिच्या रक्तशर्करेच्या पातळीवर नियंत्रण ठेवले नाही, तर ती लवकरच मधुमेही बनेल. मधुमेही व्यक्ती उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या यांसारख्या अनेक आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. ह्या सर्व आजारांवर उपचार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेटची आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटची किंमत नगण्य असते.
न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटची किंवा न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाएटची किंमत न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटमध्ये समाविष्ट केलेली असते. न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटसोबत तुम्हाला स्वीटनरचे सॅशे मोफत मिळतात. त्यात उत्तम दर्जाच्या वनौषधी आणि पोषक घटक असतात. एवढ्या कमी किमतीत हे सर्व मिळणे अशक्य असते.

प्र.१५ – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम बाजारात उपलब्ध असलेल्या इतर उत्पादनांपेक्षा चांगले कसे असते?

न्यूट्रिचार्ज ग्लायसेम म्हणजे एक पोषक पूरक आहार आहे, जो खास मधुमेहपूर्व स्थिती असलेल्या लोकांसाठी तयार करण्यात आलेला आहे. त्यात रक्तशर्करेचे अधिक चांगले व्यवस्थापन करता यावे म्हणून १२ प्रकारच्या वनौषधी, प्रथिने, तंतुमय पदार्थ, दालचिनी आणि इतर अनेक पोषक घटक असतात. बाजारातील इतर कोणत्याही उत्पादनामध्ये अशा उत्तम दर्जाच्या वनौषधी आणि पोषक घटक नसतात.

प्र.१६ – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट कोणत्या वेळी घ्यावेत?

न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट दररोज सकाळी रिकाम्या पोटी चघळावी. कमी चरबीयुक्त एक ग्लासभर दुधात न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटचा एक स्कूप त्यासोबत दिलेल्या स्वीटनरच्या एका सॅशेसहित मिसळा. हा शेक न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेटसोबत घ्या.

प्र.१७ – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट किती काळपर्यंत घेतले पाहिजेत?

न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट रक्तशर्करा सर्वसामान्य पातळीत येईपर्यंत म्हणजेच १४० एमजी/डीएलच्या खाली येईपर्यंत घेतले पाहिजे. आम्ही अशी शिफारस करतो की, तुम्ही रक्तशर्करेची सामान्य पातळी गाठल्यानंतरही घेणे चालूच ठेवावे ज्यामुळे ती पुन्हा वाढणार नाही.

प्र.१८ – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएटच्या साहाय्याने किती काळात रक्तशर्करेची पातळी सामान्य होईल अशी अपेक्षा आहे?

सामान्यत:, एका महिन्यात रक्तशर्करा २० एमजी/डीएल एवढी कमी होते. एखाद्या व्यक्तीच्या रक्तशर्करेची पातळी कमी होणे हे तिने न्यूट्रिचार्ज ग्लायसेम नियमितपणे घेण्यावर, तिच्या आहारावर आणि शारीरिक क्रियांवर अवलंबून असते.

प्र.१९ – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेमम प्रोडाएट मधुमेही लोकांना दिले जाऊ शकते का?

होय, न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेमम प्रोडाएटच मधुमेही लोकांना दिले जाऊ शकते. यामुळे त्यांचा स्टॅमिना वाढेल आणि त्यांना अधिक उत्साही वाटेल. पण ते त्यांची मधुमेहावरची औषध घेत राहतील ह्याची खातरजमा कृपया करा.

प्र.२० – जर मधुमेहपूर्व स्थितीतील व्यक्तीची स्थिती फक्त न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेटनेच सुधारत असेल, तर न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाएट सेवन करण्याची काय गरज आहे?

न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेमम प्रोडाएट या दोहोंमध्ये वेगवेगळी पोषकद्रव्ये असतात, ज्यांची मदत रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी होते. म्हणून, योग्य ते परिणाम साधण्यासाठी हे दोन्हीही एकत्रितपणे सेवन करणे आवश्यक असते.

प्र.२१ – न्यूट्रिचार्ज मॅन टॅब्लेट किंवा न्यूट्रिचार्ज वूमन टॅब्लेट यांचे सेवन न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेमम प्रोडाएट यांच्यासोबत केले जाऊ शकते का?

होय, हे दिले जाऊ शकते.

प्र. २२ – न्यूट्रिचार्ज प्रोडाएट किंवा न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाएट यांचे सेवन न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेमम प्रोडाएट यांच्यासोबत करणे आवश्यक असते का?

न्यूट्रिचार्ज प्रोडाएट किंवा न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाएट यांचे सेवन न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेमम प्रोडाएट यांच्यासोबत करणे आवश्यक नसते.

प्र. २३ – न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेमम प्रोडाएट यांचे सेवन करीत असताना अजून कशाची काळजी घ्यायची असते का?

न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेमम प्रोडाएट घेत असताना साखरविरहित समतोल आहार घेणे आणि व्यायाम करणे (६००० पावले चालणे आणि २५० पायऱ्या चढणे) आवश्यक असते.