Select Page
nutricharge-S5-product

न्यूट्रिचार्ज S5

Rs. 550.00

नायगेला सटायव्हा (काळे जिरे/कलोंजी): पारंपारिक उपाययोजनांमध्ये काळ्या जिऱ्यांचा तेलाचा वापर 2000 वर्षांपेक्षा अधिक जुन्या काळापासून करण्यात येत आहे. त्याच्या दाह-विरोधी, अँटी-ऑक्सिडंट आणि प्रतिकार क्षमता वाढविण्याच्या गुणांमुळे, याचा हृदयवाहिनीचे विकार, चेता संस्था, त्वचेचे संसर्ग, पुनरुत्पादक संस्था, श्वसन संस्था, कंकाल संस्था आणि पचनाच्या विकारांसह अनेक रोगांवर फायदेशीर परिणाम दिसून आला आहे. हे कोलेस्टेरॉल (एलडीएल), ट्रायग्लिसराईड्स, रक्त दाब आणि साखरेची पातळी लक्षणीय प्रमाणात कमी करते. मुस्लिमांच्या प्रोफेट मुहम्मद यांनी म्हटले आहे की 'मृत्यू वगळता सर्व रोगांसाठी हा उपचार आहे.'

ऑसिमम (तुळस) मिश्रण: यात तुळशीच्या चार प्रकारांचे एक अद्वितीय मिश्रण असते. तुळशीला त्याच्यातील औषधीय गुणधर्मांमुळे 'वनौषधींची राणी' असे म्हटले जाते. यात अँटी-ऑक्सिडंटस असतात आणि प्रतिकार क्षमता वाढविण्याचे गुणधर्म असतात. हे त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे, तसेच खोकला, सर्दी आणि तापाविरुद्ध रक्षण करते. याचे तेल जीवाणूंचे संसर्ग, ॲलर्जीज, ताप, वेदना आणि तणावापासून रक्षण करते.

अझाडिराच्टा (कडुलिंब): एक शुद्धीकारक असलेले कडुलिंब रक्त आणि आतून शरीर शुद्ध करण्यासाठी प्रचलित आहे. यामुळे यकृताचे पुनरुज्जीवन होते आणि त्याचे कार्य सुरळीत होते. कडुलिंबाच्या नियमित सेवानाने यकृतात जमा झालेले विषारी पदार्थ नियमितपणे बाहेर टाकले जातात. कडुलिंबात मधुमेहविरोधी गुण असतात आणि ते रक्तातील कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेच्या बदलत्या पातळीस सामान्य ठेवण्यात मदत करते. कडुलिंब त्वचेच्या पुनरुज्जीवनात देखील मदत करते.

ॲलो बार्बाडेन्सिस (कोरफड) गर एक विषाक्तपणा दूर करणारे असून त्यात आरोग्यासाठी भरपूर फायदे असतात आणि ते विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असे स्रोत आहे. यात वृद्धापकाळ लांबविणारे गुण आहेत आणि त्याला त्वचा निरोगी, युवा आणि चमकदार ठेवण्यासाठी वापरले जाते. यामुळे मलावरोध दूर होतो आणि पचनसंस्था साफ होते.

मेंथा स्पायसेटा (पुदिना, मिंट) एक सुगंधी वनस्पती आहे आणि त्याला अपचन, वायु, आम्लतासारख्या पोटातील काही विकारांवर उपचारासाठी वापरले जाते.

Nutricharge S5

न्यूट्रिचार्ज उत्पादने फक्त आरसीएममधून विकली जातात.

उत्पादनाचे वर्णन

न्यूट्रिचार्ज S5 एक 100% शाकाहारी मृदू असे कॅप्स्यूल आहे, ज्यात 200 मिग्रा काळे जिरे, 150 मिग्रा तुळशीचे मिश्रण (ऑसिमम बेसिलिकम, ऑसिमम सँक्टमचा अर्क, ऑसिमम सँक्टम, ऑसिमम ग्रॅटिसिमम), 100 मिग्रा कडुलिंबाचा अर्क, 25 मिग्रा कोरफडीचा अर्क, आणि 10 मिग्रा पुदिना सामावलेले असते.

न्यूट्रिचार्ज S5 वापरण्यासाठी अतिशय सोपे आणि सुविधाजनक आहे.

न्यूट्रिचार्ज S5 ग्राहकांसाठी अनुकूल अशा 30 कॅप्स्युल्स (2 स्ट्रिप्स x 2) मध्ये उपलब्ध आहे.

कोणी सेवन करावे?
18 वर्षांवरील सर्व प्रौढांनी

मात्रा:
न्यूट्रिचार्ज S5 चे 1 कॅप्स्यूल दिवसातून एकदा जेवण केल्यानंतर त्वरित घेतले पाहिजे. याला रोज दिवसाच्या एकाच वेळी घेतले पाहिजे.

एमआरपी: 550/- : 30 शाकाहारी मृदू कॅप्स्युल्ससाठी

रिव्ह्यूज्‌

अजून कोणतेही रिव्ह्यूज्‌ नाहीएत.

“न्यूट्रिचार्ज S5” रिह्यू करणारे पहिले मानकरी व्हा.

Your email address will not be published. Required fields are marked *